सौ. भारती प्रतापराव पवार यांचे निधन
मंगळवारी दुपारी १२ वाजता नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
ग्रामराज्य वृत्तसेवा, पुणे
पुणे, दि. १७ मार्च २०२५ :- सौ. भारती प्रतापराव पवार यांचे सोमवारी (दि. १७ मार्च) सायंकाळी निधन झाले. त्या ७७ वर्षाच्या होत्या. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार हे त्यांचे पती तर, व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार हे त्यांचे पूत्र होत.
येत्या मंगळवारी (दि.१८ मार्च) रोजी दुपारी १२ वाजता पुण्यातील नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या मागे पती प्रतापराव पवार, मुलगा अभिजित पवार, मुलगी अश्विनी, सुन मृणाल पवार आणि नातवंडे असा परिवार आहे.
