Maharashtra Day : प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालय व हौसाबाई कामठे ज्युनिअर कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन! 

कामगार दिनानिमित्त वसंतदादा पाटील प्रतिष्ठानतर्फे आदर्श कामगारांचा सन्मान

Maharashtra Day : प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालय व हौसाबाई कामठे ज्युनिअर कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन! 
पुणे:- कामगार दिनानिमित्त आत्माराम जाधव यांचा सत्कार करताना वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १ मे २०२६ :- कोंढवा बुद्रुक (ता. हवेली) येथील प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालय आणि हौसाबाई सोपानराव कामठे कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानतर्फे कामगार दिनानिमित्त आदर्श कामगारांचा सत्कार करण्यात आला. 

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्यावतीने शुक्रवारी (दि.१ मे) प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालय व हौसाबाई सोपानराव कामटे ज्युनिअर कॉलेजमध्ये झेंडावंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जालिंदर कामठे यांच्या हस्ते आत्माराम जाधव या आदर्श कामगाराचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. 

या कार्यक्रमास केदारेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक शिवाजीराव मरळ, प्राचार्य डॉ. प्रमोद बोत्रे, मुख्याध्यापिका सुरेखा कोलते, शिक्षक वर्ग आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना जालिंदर कामठे यांनी आदर्श कामगार जाधव यांच्या कष्ट, प्रामाणिकपणा व समाजातील योगदानाबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. शिवाय महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा इतिहास व कामगार चळवळीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. कामगार हा देशाच्या विकासाचा कणा आहे, त्यांच्या योगदानामुळेच देशाची प्रगती शक्य होते असे, मत कामठे यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कामगारांच्या हक्कांसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भानुदास रिठे यांनी केले. प्रा. शंकर बांगर यांनी आभार मानले.