HSC result : कोंढवा बुद्रुक येथील हौसाबाई सोपानराव कामठे ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता १२ वीचा १०० टक्के निकाल! 

संस्थेचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांची माहिती : कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण 

HSC result : कोंढवा बुद्रुक येथील हौसाबाई सोपानराव कामठे ज्युनिअर कॉलेजचा  इयत्ता १२ वीचा १०० टक्के निकाल! 

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ३ मे २०२६ :- हवेली तालुक्यातील कोंढवा येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या हौसाबाई सोपानराव कामठे कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखांचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती या संस्थेचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी दिली. 

याशिवाय वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या येवलेवाडी (ता. हवेली ) येथील श्रीमती जनाबाई काशिनाथ ओव्हाळ ज्युनिअर कॉलेजचा कला शाखेचा निकाल ९५ टक्के आणि  वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

दरम्यान उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना अध्यक्ष जालींदर कामठे म्हणाले, "या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, प्राचार्य तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा विश्वास यांचा मोठा वाटा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने उत्कृष्ट कामगिरी करून संस्थेचा व विद्यालयाचा गौरव वाढवला आहे. या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच शिक्षकवृंद व पालकांचेही हार्दिक आभार आणि आगामी वाटचालीसाठी सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. असेच यश संपादन करत राहा आणि संस्थेचे व विद्यालयाचे नाव उंचावत ठेवा."

हौसाबाई सोपानराव कामठे ज्युनिअर कॉलेजचे शाखानिहाय गुणानुक्रमे पहिले तीन विद्यार्थी खालीलप्रमाणे:- 

१) कला शाखा 

१)  आरती विनोद सोळंके --- ६५.६७ टक्के. 

२) सुकन्या शंकर बंदीछोडे --- ६०.१७ टक्के. 

३) गणेश किशोर साळुंखे --- ६० टक्के. 

२) वाणिज्य शाखा 

१) महेश बालाजी पांचाळ ---  ८३.१७ टक्के. 

२) सायली अप्पा गायकवाड ---  ७८.१७ टक्के. 

३) धनश्री सुरेश अहिरे --- ७५.३३ टक्के. 

३) विज्ञान शाखा 

१) अनुष्का युवराज फडतरे --- ७४.५० टक्के. 

२) आर्यन संदीप कुमावत --- ६३.३३ टक्के.

३)  नयन बंडू मासाळ --- ६०.१७ टक्के.

श्रीमती जनाबाई काशिनाथ ओव्हाळ जूनियर कॉलेज

१) वाणिज्य शाखा 

१) अर्पिता नीलकंठ सुतार --- ७७.३३ टक्के. 

२)  नगमा हुसेन पठाण --- ७४.१७ टक्के. 

२) अर्चना मारुती जानकर --- ७४.१७ टक्के.  

३) खुशबू अब्दुल पठाण --- ६९.६७ टक्के. 

२) कला शाखा

१) ऋतुजा विजय जाधव --- ८१.१७ टक्के. 

२)दीक्षा सुनील शिंदे --- ६७ टक्के. 

३) राज शिवाजी धनवडे --- ६५.६७ टक्के.