वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संचलित तीन शाळांचा दहावीचा १०० टक्के निकाल 

संस्थेचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्याकडून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन 

वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संचलित तीन शाळांचा दहावीचा १०० टक्के निकाल 
पुणे:- वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे

प्रा. मीरा बडे-सांगळे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १३ मे २०२५ :-   कोंढवा बुद्रुक येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संचलित तीन माध्यमिक शाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे.यामध्ये हवेली तालुक्यातील कोंढवा बुद्रुक येथील प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालय, हिवरे (या. पुरंदर) येथील  गुरुवर्य नारायण महाराज माधाय्मिक विद्यालय आणि दौंड तालुक्यातील कोरेगाव भिवर येथील शहीद सोनू भिका वर्पे माध्यमिक विद्यालय या तीन माध्यमिक शाळांचा समावेश आहे.

दरम्यान, येवलेवाडी (ता.हवेली) येथील बी.के कामठे विद्यालयाचा निकाल ९९ % टक्के निकाल लागला आहे. या सर्व शाळांमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी अभिनंदन केले आहे.

माध्यमिक शालांत परीक्षेच्या महत्वाच्या टप्प्यावर तुम्ही मिळवलेलं यश खरोखरच कौतुकास्पद आहे. हे यश प्राप्त करण्यासाठी घेतलेली खडतर मेहनत तुम्हा विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक नवी ऊर्जा देणारी आहे. तुम्हा सर्वांचा असाच यशस्वी प्रवास भविष्यातही कायम रहावा, अशा शब्दांत संस्थेचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, या यशाबद्दल कामठे पालकांचे आणि सर्व शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर यांचेही   अभिनंदन केले आहे. 

वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संचलित शाळांचे गुणानुक्रमे पहिले तीन विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत.

प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालय 

१) अक्सा रियाज सय्यद --- ९१.४० टक्के 
२) अनुष्का संजय साळुंखे --- ९० टक्के 
३ समृद्धी सुरेश सूर्यवंशी --- ८९.४० टक्के 

गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालय 

१) अनिशा पांडुरंग चावीर --- ९४.४० टक्के 
२) प्राची शरद दळवी --- ८८.६ टक्के 
३)वैभवी विलास दिघे---८७.६० टक्के 
३)अल्फिया असिफ शेख --- ८७.६० टक्के 

शहीद सोनू भिका वर्पे माध्यमिक विद्यालय

१) स्नेहा गणेश वर्पे --- ९७.४० टक्के 
२) समृद्धी पांडुरंग मांजरे --- ९४.६० टक्के 
३) श्रावणी सुरेश गाढवे --- ९२.२० टक्के 

बी.के कामठे विद्यालय 

१) प्रणावी बालाजी शिंदे --- ८७.०० टक्के 
२) आफिफा ताहीर शेख --- ८४.२० टक्के 
३) सुफिया जावेद हाजी --- ८३ टक्के