Archana Shah appointed as state secretary of Mahila Congress : प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या चिटणीसपदी अर्चना शहा-भिवरे पाटील यांची नियुक्ती

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्याकडून निवडीची घोषणा 

Archana Shah appointed as state secretary of Mahila Congress : प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या चिटणीसपदी अर्चना शहा-भिवरे पाटील यांची नियुक्ती
पुणे:- महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या नवनियुक्त चिटणीस अर्चना शहा -भिवरे पाटील.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १८ ऑक्टोबर २०२५ :-  महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या चिटणीसपदी पुणे शहरातील अर्चना शहा-भिवरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी शुक्रवारी (दि.१७ ऑक्टोबर) केली आहे. 

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या या नव्या कार्यकारिणीत दोन सल्लागार सदस्य, १३ सरचिटणीस, ०७ चिटणीस आणि २३ जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये  पुणे शहरातील तीन महिला कार्यकर्त्यांचा समावेश आहे. प्रदेश महिला काँग्रेस कमिटीत चिटणीसपदी नियुक्ती झालेल्या अर्चना शहा-भिवरे पाटील या पुणे शहर व जिल्ह्यातील एकमेव कार्यकर्त्या आहेत.

प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या चिटणीसपदी नियुक्ती झालेल्या अर्चना शहा-भिवरे पाटील या मुळच्या पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आहेत. लग्नानंतर त्या पुणेकर झाल्या आहेत. त्यांनी याआधी पुणे जिल्हा महिला कॉंग्रेस उपाध्यक्ष,पुणे शहर काँग्रेसच्या सरचिटणीस, अखिल भारतीय मराठा महासंघ संलग्न बहुजन महाआघाडीच्या प्रदेश अध्यक्ष, अखिल भारतीय सरपंच परिषद संघ, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आदींसह विविध पदांवर काम केले आहे.

त्या गेल्या २० ते २२ वर्षांपासून  सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत. मराठा आरक्षण चळवळीतील नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण मागणी लढ्यामध्ये त्या सक्रिय आहे. त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक आघाडीत ३ ते ४ वर्षे काम केले आहे‌. शिवाय गोवा, गुजरात,कर्नाटक निवडणूक प्रभारी म्हणून काम केले आहे. महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद अभियान) मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.