A building for the disabled will be constructed in Saswad : पुरंदर तालुक्यातील दिव्यांगांसाठी सासवडला दिव्यांग भवन उभारणार!
माजी आमदार संजय जगताप : भिवरीत दिलीप कटके मित्र परिवारातर्फे दिव्यांगाना कृत्रिम साधने वाटप
ग्रामराज्य वृत्तसेवा
सासवड, दि. २९ सप्टेंबर २०२५ :- पुरंदर तालुक्यातील दिव्यांगांना कायमच मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला असून यापुढेही दिव्यांगांना सर्व प्रकारची मदत करण्यात येईल. गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेले पुरंदर तालुक्यातील दिव्यांगांसाठी सासवडमध्ये लवकरच अद्ययावत आणि सुसज्ज असे दिव्यांग भवन उभारण्यात येईल, असे पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी येथे बोलताना सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्यावतीने सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त भाजपचे पुरंदर तालुका उपाध्यक्ष दिलीप कटके यांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींचा सन्मान आणि त्यांना कृत्रिम साहित्याचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संजय जगताप यांच्या हस्ते दिव्यांगांना कृत्रीम साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच भिवरी ग्रामपंचायतच्यावतीने पाच टक्के दिव्यांग निधीचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, सरचिटणीस गंगाराम जगदाळे, नीरा बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे, दिलीप कटके, साकेत जगताप, भिवरीच्या सरपंच मोनाली कटके, उपसरपंच मारुती कटके, प्रहार संघटनेच्या राज्य महिलाध्यक्षा सुरेखा ढवळे, आस्करवाडीच्या सरपंच नीलम कटके, बोपगावच्या सरपंच सारिका गुरव, चांबळीचे सरपंच गोपाळ कामठे, थापेवाडीचे सरपंच निलेश जगदाळे, खरेदीविक्री संघाचे संचालक शांताराम बोराडे, सोमुर्डीचे सरपंच शांताराम शेंडकर, भाजपच्या वैद्यकीय सेलचे डॉ. सुमित काकडे, अमोल जगताप, रानमाळ्याचे सरपंच विशाल कुदळे आदी उपस्थित होते.
समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. भाजपची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता काम करीत आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील वंचित असलेला दिव्यांग हा समाजाचा केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी काम करीत राहील, अशी भावना यावेळी भाजपचे उपाध्यक्ष दिलीप कटके यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला गुलाब घिसरे, समीर तरवडे, सागर भोसले, सुरज अवचरे, महेश तळेकर, मयूर फडतरे, सागर कटके, भाऊसाहेब दळवी, संभाजी नाटकर, मस्कु दळवी, हनुमंत साळुंखे, सौरभ कटके यांच्यासह जिल्हा परिषदेच्या दिवे-गराडे गटातील दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब दळवी यांनी केले.सुनील गोफने यांनी आभार मानले.
