HPV Shield: देशभर ९ ते १४ वर्षे वयोगटातील किशोरी मुलींसाठी मोफत HPV लसीकरण; गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध मोठे पाऊल.

देशभर ९ ते १४ वर्षे वयोगटातील किशोरी मुलींसाठी मोफत HPV लसीकरण मोहीम; शाळा व सरकारी आरोग्य केंद्रांतून लस, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध मोठे पाऊल.

HPV Shield: देशभर ९ ते १४ वर्षे वयोगटातील किशोरी मुलींसाठी मोफत HPV लसीकरण; गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध मोठे पाऊल.
Free HPV vaccination for girls across the country.

केंद्र सरकार किशोरवयीन मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी राष्ट्रव्यापी मोफत HPV लसीकरण मोहीम सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही लस राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट होणार असून, शाळा व सरकारी आरोग्य केंद्रांद्वारे मुलींना पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे.तज्ज्ञांच्या मते, ९ ते १४ वयोगटातील मुलींना वेळेवर लस दिल्यास भविष्यात कर्करोगाच्या प्रकरणांत मोठी घट नोंदवली जाऊ शकते.जागतिक आरोग्य संघटनेनेही HPV लसीकरणाला प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय मान्यता दिली आहे, त्यानुसार भारत हा महत्त्वाचे पाऊल उचलणाऱ्या देशांपैकी एक ठरणार आहे.मोहीमेच्या यशासाठी ग्रामीण भागात जागरूकता, अफवा दूर करणे आणि पालकांचा विश्वास जिंकणे, हे सरकारसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.