S.S.C. & H.S.C. Suppliment exam-2025 result : इयत्ता दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा येत्या मंगळवारी निकाल!

मंगळवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होणार :  दुसऱ्या दिवसापासून गुण पडताळणीसाठी अर्ज करता येणार 

S.S.C. & H.S.C. Suppliment exam-2025 result : इयत्ता दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा येत्या मंगळवारी निकाल!
पुणे:- एस‌.एस. सी. बोर्ड

डॉ.गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २८ जुलै २०२५ :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जून आणि जुलै २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल येत्या मंगळवारी (दि.२९ जुलै)जाहीर करण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना घरबसल्या हा निकाल पाहता येणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी सांगितले. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) पुरवणी परीक्षा दिनांक २४ जून, २०२५ ते दिनांक ०८ जुलै, २०२५ आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) पुरवणी परीक्षा दिनांक २४ जून, २०२५ ते १६ जुलै, २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.

या दोन्ही पुरवणी परीक्षेचा ऑनलाइन निकाल हा पुढील संकेतस्थळावर पाहता येणार आहे. 

इयत्ता दहावीचा निकाल 

https://www.mahahsschoard.in

http://sscresult.mkcl.org

इयत्ता बारावीचा निकाल 

https://www.mahahsscboard.in

http://hscresult.mkcl.org

दरम्यान, या ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १०वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) पुरवणी परीक्षेतील प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांच्या गुणांचे फेरमूल्यांकन करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनाचे अर्ज संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्द‌तीने https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर दाखल करणे अनिवार्य आहे. 

यानुसार विद्यार्थ्यांना येत्या ८ ऑगस्टपर्यंत हे अर्ज करता येणार आहे.या पुरवणी परीक्षेतील विषयांच्या गुणांचे फेरमूल्यांकन करण्यासाठी आपापल्या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून पहिल्यांदा उत्तरपत्रिकेची ऑनलाइन पध्दतीने अर्ज छायाप्रत घेणे आवश्यक आहे.