स्वर्गीय सोपानराव सहादू कामठे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप!

पुरंदर तालुक्यातील माध्यमिक शाळांना फायदा : वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांचा पुढाकार 

स्वर्गीय सोपानराव सहादू कामठे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप!

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १४ मे २०२६ :- पुरंदर तालुक्यातील माध्यमिक विद्यालयांना शैक्षणिक बळ मिळावे आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने स्वर्गीय सोपानराव सहादू कामठे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त एक लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यासाठी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष  जालिंदर कामठे यांनी  पुढाकार घेतला. 

या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पुरंदर तालुका पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे प्रमुख उपस्थित म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमात पुरंदर तालुक्यातील विविध माध्यमिक विद्यालयांना एक लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले. शिक्षण क्षेत्राला मदत करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वसंतदादा पाटील प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्या स्मिता निगडे, ईश्वर बागमार, शिवाजी साळुंखे, विजया महाडिक, हिवरे गावच्या सरपंच शोभाताई दळवी, नंदकुमार सागर, कुंडलिक मेमाने, पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दिलीप नेवसे, विजय गुरव, अर्जुन शेंडगे, राजेंद्र चौगुले, विजय काकडे, मनोहर कामठे, रमेश  कुदळे, शांताराम गायकवाड, नरसिंह गायकवाड, सचिन लिंबोरे, शांताराम दळवी, शंकर दळवी, शंकर कुदळे, गोविंद गायकवाड तसेच तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोज वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी स्वर्गीय सोपानराव सहादू कामठे यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबविण्यात आलेल्या या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमाचे कौतूक केले.