Purandar Nationalist Congress party : विविध विकास कामांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरंदर तालुक्यात एक नंबरला आणणार!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जालींदर कामठे : पालकमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने पुरंदरला बारामती खालोखाल पुणे जिल्ह्यात अग्रभागी आणणार
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १० ऑक्टोबर २०२५ : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने आगामी काळामध्ये पुरंदर तालुक्यातील विकास कामांचा राहिलेला अनुशेष भरून काढणार आहे. तसेच तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विकास गंगा आणणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जालींदर कामठे यांनी शुक्रवारी (दि.१० ऑक्टोबर) बोपगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथे 42 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन कामठे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे हे होते. यावेळी अमित झेंडे, सरपंच सारिका गुरव, शालन फडतरे, ज्योती फडतरे, ग्रामसेवक राखी ढगारे आदी उपस्थित होते.
यावेळी कामठे यांच्या हस्ते कानिफनाथ रोड कॉंक्रिटीकरण 10.50 लक्ष रुपये, नांगरी आळी काँक्रिटीकरण 10.50 लक्ष रुपये, जगदाळे आळी कॉंक्रिटीकरण 10.50 लक्ष रुपये, कानिफनाथ मंदिर पालखी मार्ग ब्लॉक बसवणे 10.50 लक्ष रुपये, अशा एकूण 42 लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. कामठे पुढे म्हणाले, "या विकासकामांमध्ये रस्ते दुरुस्तीचा समावेश आहे. या कामांमुळे ग्रामस्थांना मूलभूत सुविधांचा लाभ होणार आहे. यामुळे गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल."
या कार्यक्रमासाठी मारुती फडतरे, प्रकाश फडतरे, योगेश फडतरे, दयानंद फडतरे, मार्केट कमिटीचे सभापती संदीप फडतरे, साहेबराव फडतरे, बाळासाहेब फडतरे, रवींद्र फडतरे, बाळू पवार ,अशोक दादा फडतरे, सुरज फडतरे, राजेंद्र फडतरे, विजय जगदाळे ,विजय फडतरे, शहाजी फडतरे, विश्वास फडतरे नागेश फडतरे, दीपक फडतरे, दत्तात्रेय फडतरे, बापू फडतरे, कानिफनाथ फडतरे, शामराव फडतरे आदी उपस्थित होते.
