ZP Guruji's initiative to provide a helping hand to the needy Students:-निराधार विद्यार्थ्यांना मदतीसाठीच्या या अनोख्या उपक्रमाचा समाजाने आदर्श घ्यावा! 

घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांचे आवाहन : यंदा ९६ विद्यार्थ्यांना  झेडपी गुरूजींचा मदतीचा आधार

ZP Guruji's initiative to provide a helping hand to the needy Students:-निराधार विद्यार्थ्यांना मदतीसाठीच्या या अनोख्या उपक्रमाचा समाजाने आदर्श घ्यावा! 
शिनोली (ता.आंबेगाव) :- निराधार विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत यंदा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेल्या ९६ विद्यार्थ्यांसमवेत सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार, जिल्हा शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे माजी निमंत्रित सदस्य दत्तात्रेय वाळुंज आणि पांडुरंग महाराज येवले आदी.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

शिनोली (ता.आंबेगाव), दि. १३ जुलै २०२५ :- पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुरूजींनी सुरू केलेला निराधारांना एक हात मदतीचा आधार हा उपक्रम सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. या उपक्रमापासून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे. कारण एका ज्योतीने दुसरी ज्योत प्रज्वलीत झाली पाहिजे. परिस्थितीवर मात करत करत अनंत अडचणींचा जो सामना जो विद्यार्थी करतो, आयुष्यात तोच यशस्वी होतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने संकटावर मात करून पुढे जाण्याची जिद्द ठेवली पहिजे. भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानने आतापर्यंत हजारो हात तयार केले आहेत.जे पुढे जाऊन समाजात दातृत्वाचा एक आदर्श निर्माण करतील, असे मत घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार यांनी  व्यक्त केले. 

भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे  सुरू केलेल्या एक हात मदतीचा आधार निराधारांना या  कार्यक्रमात पवार यांच्या हस्ते गरजू व निराधार शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पांडुरंग महाराज येवले, पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे, उपशिक्षणाधिकारी अस्मा मोमीन, आंबेगावच्या गट शिक्षणाधिकारी रुपाली धोका, खेडचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील (डाएट) अधिव्याख्याता राजश्री तिटकारे, जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी जीवन कोकणे,विस्तार अधिकारी उषा मसळे, खरेदी- विक्री संघाचे संचालक मधुकर बोऱ्हाडे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक सिताराम लोहोट, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे, हनुमान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीराम येवले, मुख्याध्यापक अजित अभंग, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक बाळासाहेब कानडे, पुणे जिल्हा शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष संजय हुले,आंबेगाव तालुका शिक्षक पतसंस्था सभापती संजय केंगले, उपसभापती दत्ता मेचकर, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सचिन तोडकर, खेड तालुकाध्यक्ष अभिजित नाईकरे, शिक्षक समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेळकंदे, पतसंस्था संचालक बाळासाहेब साबळे, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाचे माजी अध्यक्ष वि.म.शिंदे व युवा नेते निलेश बोऱ्हाडे आदी उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत यंदा ९६ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 

 केंद्रीय लोकसेवा आणि राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी  होणारे विद्यार्थी आणि वैदयकीय व अभियांत्रिकीसारख्या क्षेत्रात ग्रामीण भागातील विशेषतः मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी हेच मोठ्या संख्येने आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत 50 विद्यार्थी हे एकट्या पुणे जिल्ह्यातील असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.

समाजातील विविध घटकांनी मंदिर व धार्मिक कार्यक्रमांना मदत करण्याबरोबरच गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणे, हे भारताचे भविष्य घडविण्यासारखे आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने मुलांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे,अशी अपेक्षा शारदा प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग महाराज येवले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. 

बालपणीच आई किंवा वडिलांचे छत्र हरपलेल्या तसेच निराधार, कोरोना संसर्गामुळे पालकत्व गमावलेल्या व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक हातभार लावण्याचा उपक्रम आंबेगाव तालुक्यातील दत्तात्रेय वाळुंज, नंदकुमार येवले, सुरेंद्र डोके, किसन कोंढवळे या चार शिक्षकांनी सुरू केला आहे. या वर्षीपासून या उपक्रमात नारायण काळे, सुनिल पाटील, सुनिल बुरसे, मच्छिंद्र झांजरे, किसन शिंगाडे, ईश्वर फदाले, आनंद संत, प्रदीप चासकर हे आणखी काही शिक्षक सहभागी झाले आहेत.

यावेळी उपजिल्हाधिकारी करिष्मा मेश्राम, विक्रीकर उपायुक्त रोहित काळे, नवनियुक्त पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते, पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार,तहसिलदार संदीप पाटील आदी नामवंतांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती लावली आणि  शिक्षकांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. 

या कार्यक्रमाला आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक जिजाराम येवले, टी एस.पतसंस्थेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम फदाले, कानसे गावच्या सरपंच सविता वाळुंज, महाळुंगेचे उपसरपंच गणपत ढेरंगे,गंगापूरचे उपसरपंच संदिप येवले, फुलवडे गावचे सरपंच बबन मोहरे,औदुंबर पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष जंगले, देखरेख संघाचे संचालक भरत फदाले, सामाजिक कार्यकर्ते शंकर शहा, लहू बोराडे, निलेश येवले, विश्वनाथ लोहोट, सतीश लोहोट, बाळासाहेब आवटे, संतोष भवारी, रोहिदास येवले, देविदास बोऱ्हाडे, प्रकाश बोऱ्हाडे, गजानन वाळुंज, अविनाश वरे, शालीवान बोऱ्हाडेआणि विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी मंगेश बुरुड, शाम गोरे, ठकसेन गवारी, संतोष राक्षे, सखाराम वाजे, अशोक मधे, संतोष गवारी, अरविंद मोढवे, निलेश मिडगे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.