DIO Appointment :  पुणे जिल्हा माहिती अधिकारीपदी (डिआयओ) युवराज पाटील यांची नियुक्ती!

पुण्याचे डिआयओ रविंद्र ठाकुर यांची जळगावला बदली : पाटील यांनी पदभार स्वीकारला

DIO Appointment :  पुणे जिल्हा माहिती अधिकारीपदी (डिआयओ) युवराज पाटील यांची नियुक्ती!
पुणे:- नवे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २८ ऑगस्ट २०२५ :- पुणे जिल्हा माहिती अधिकारीपदी युवराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. पाटील यांनी गुरुवारी (दि.२८ ऑगस्ट) पदभार स्वीकारला आहे. पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी रविंद्र ठाकूर यांची जळगाव जिल्हा माहिती अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

राज्य सरकारने राज्यातील काही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यानुसार श्री. युवराज पाटील यांची पुणे जिल्हा माहिती अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील हे सध्या जळगाव येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते. जळगाव येथे कार्यरत असताना विविध सरकारी योजना व उपक्रम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत  प्रभावीपणे पोहोचविण्यात पाटील यांचे मोठे योगदान आहे. 

पुण्याचे नवे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील हे मूळचे मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील आहेत.सरकारी सेवेत दाखल होण्यापूर्वी त्यांनी पुण्यातील भारती विद्यापीठ आणि सिंबायोसिस विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले आहे. ते प्रसिद्ध लेखक असून एका चित्रपटातही काम केले आहे.