Dattatreya Munde promoted to Deputy Commissioner : परिविक्षा अधीक्षक दत्तात्रेय मुंडे यांना महिला व बाल विकास उपायुक्तपदी पदोन्नती! 

पदोन्नतीनंतर मुंडे यांची नागपूरला नियुक्ती : पदभार स्वीकारला 

Dattatreya Munde promoted to Deputy Commissioner : परिविक्षा अधीक्षक दत्तात्रेय मुंडे यांना महिला व बाल विकास उपायुक्तपदी पदोन्नती! 
पुणे:- महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त दत्तात्रेय मुंडे.

ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. १२ सप्टेंबर २०२५ :- पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विभागाचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे यांना राज्य सरकारने राज्याच्या महिला व बालविकास विभागात उपायुक्तपदी पदोन्नती दिली आहे. पदोन्नतीनंतर मुंडे यांची नागपूर येथे नियुक्ती केली आहे.ते सध्या पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालयात परिविक्षा अधीक्षक या पदावर कार्यरत होते. दरम्यान, मुंडे यांनी नुकताच उपायुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. 

राज्य सरकारने महिला व बाल विकास विभागातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सहायक आयुक्त, परिविक्षा अधिक्षक (गट-अ) या संवर्गातील अधिकाऱ्यांची पदोन्नती केली आहे. या पदोन्नतीत मुंडे यांचाही समावेश आहे. दरम्यान, मुंडे यांनी याआधी पुणे जिल्हा परिषदेत महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी म्हणून काम केलेले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या कार्यकाळात मुंडे यांनी पुणे जिल्ह्यात आदर्श अंगणवाडी, परसबाग, बाल आनंद मेळावा आदी प्रकल्प राबविले होते आदर्श अंगणवाडी प्रकल्पांर्गत अंगणवाड्यांमध्ये बेबी चेअर्स व ड्युअल डेस्क, वॉटल फिल्टर, टीव्ही व डीव्हीडी, डायनिंग टेबल आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात मुंडे यांनी मोठा पुढाकार घेतला होता.बोलक्या अंगणवाड्या प्रकल्पांतर्गत २ हजार ७१८ अंगणवाड्यांमध्ये रंगरंगोटी आणि विविध चित्र काढण्यात आली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ४ हजार ६०३ अंगणवाड्यांमध्ये बाल आंनद मेळावा हा उपक्रम राबविला होता. अंगणवाडी केंद्राना मोफत गॅस कनेक्शन व शेगड्यांचे वाटप केले आहे. शिवाय पुणे जिल्ह्यातील ३७१ अंगणवाडीमध्ये केंद्रामध्ये परसबाग तयार केल्या आहेत.